1. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच
लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा
2. तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर
ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
3. सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
4. नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
5. तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
6. नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!...
7. ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!
8. तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
9. तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
10.नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!