!...... माणूस.....!

 छान कविता आवडली म्हणून शेअर कर

तोय .


कुणी लिहिली माहीत नाही.पण खरचं खुप सुंदर कविता आहे.

तुम्ही एकदा नक्की वाचा.


*गरम कढईतल्या मोहरीपेक्षा,*


*माणसं तडतड करत आहेत.*


*काय झालंय कळत नाही,*


*फारच चीडचीड करत आहेत.*




*नातेवाईक असो, मित्र असो,*


*भयंकर स्पर्धा वाढलीय.*


*तेंव्हापासूनच माणसाची,*


*मानसिक अवस्था बिघडलीय.*




*कुणी कुणाला काहीच विचारीना,*


*मनानचं कसंही वागायलेत.*


*आजूबाजूच्या लोकांकडून,*


*जास्तच अपेक्षा ठेवायलेत.*




*कमाई किती, खर्च किती,*


*काहीच कुठे मेळ नाही.*


*भेटायला जाणं, गप्पा मारणं,*


*आता कुणालाच वेळ नाही.*




*कॅपॅसिटी नसतांनाही,*


*खरेदी उगीच करायलेत.*


*Salary व्हायलीय कमी,*


*अन हप्तेच जास्त भरायलेत.*




*शेजारच्यानी Two व्हीलर घेतली,*


*की हा घेतो फोर व्हीलर.*


*दूध बॅग आणायला सांगितली की,*


*मोजीत बसतो चिल्लर.*




*अरे, अंगापेक्षा बोंगा,*


*कशाला वाढवून बसतो.*


*पगार जरी झाली तरी,*


*उदास भकास दिसतो.*




*पर्सनल लोन, Gold लोन,*


*जे भेटेल, ते घ्यायलेत,*


*दिलेले पैसे मागितले तरी,*


*गचांडीलाच धरायलेत.*




*सहनशीलता आणि संयम,*


*कुठे चाललाय कळत नाही,*


*पॅकेज भरपूर मिळायलंय,*


*पण, समाधान काही मिळत नाही.*




*घरी काय दारी काय,*


*नुसत्या किरकीरी वाढल्यात.*


*नवऱ्याला न सांगताच,*


*बायकांनी भिश्या काढल्यात.*




*कितीही साड्या, कितीही पर्स,*


*शर्ट, पँटीला गणतीच नाही.*


*तरीही कुरकुर चालूच असती,*


*धड साडी तर कोणतीच नाही.*




*मग काय ! नवऱ्यानं म्हणावं,*


*तुला अक्कल नाही.*


*बायकोनं म्हणावं,*


*तुम्हालाच काही कळत नाही.*




*दोनदोन दिवस अबोला,*


*कशाऊनहीं भांडणं व्हायलेत.*


*लग्न झालं की पोरं पोरी,*


*वर्षातच घटस्फोट घ्यायलेत.*




*पत्नी पीडित नवऱ्याच्याही,*


*संघटना निघत आहेत.*


*डोळे मोठे करून पोट्टे,*


*बापाकडेच बघत आहेत.*




*दिवेलागण, शुंभकरोती,*


*'स्वस्थ होऊ द्या', गायब झालं,*


*शक्य असेल याच्यामुळेच,*


*माणसां माणसात वितुष्ट आलं.*




*चित्त थोडं शांत ठेऊन,*


*जुनी पाने चाळावी लागतील.*


*यदाकदाचित पुन्हा माणसं,*


*एकमेकाशी प्रेमाने वागतील.* 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


कुणी लिहिली हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या