Vote for a website Marathi Prem Kavita || love poems Marathi || मराठी प्रेम कविता
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Marathi Prem Kavita || love poems Marathi || मराठी प्रेम कविता

1

Marathi Prem Kavita|| मराठी प्रेम कविता|| चारोळ्या

आवडत मला पावसात
चिम्ब चिम्ब भिजण.
अनुभवते मी बीजा च
अन्कुरन्यासाठी रुजन.

कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली

तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो

माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं

आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो, 
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता 
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत .

तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

Marathi Prem kavita

तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन

मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून

"खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!"


"मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे .....
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!"

"या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा .....
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा !!!!"

अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.

अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)
मग क्षण भर मी पाहतच राहिलो...
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.

अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही....
तरीपण माझ्या प्रश्नाना  
तू कधि उत्तर दिले नाही....

अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस........Best Marathi Prem Kvita

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…

अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे..

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..

अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसर्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही

अस कस?
तुझ वागणं
मझ्यावर रुसणं
अन खुद्कन हसणं

असं कधीच नाही होणार ,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार

असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं आणि मी तुझ्या अस़चं 
तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत
दोघांनी आंधळं व्हावं,
कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !
कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना
तुझा चेहरा नाही मिळत बघायला.

असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!
रागावले जरी तिला कोणीही
घाव माझ्या हृदयात व्हावे
... इजा झाली माझ्या अंगी तर आईग
.... तिने म्हणावे .......!
असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!

असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…

असे म्हणतात...
हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे
 हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,
हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा 
कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते

Marathi Romantic love poems

आंस तुला संपण्याची जरी
मज आंस तुला बघण्याची
जळतो जरी विरहात तरी
मी बघतो तुला दुरुनी

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे .........
चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ...........
पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे

आज एक चूक घडली,
ती माझ्यावर चिडली,
स्वतः बनून अबोली,
गजरा मात्र विसरली.

आज काल स्वप्नांनाही 
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..
जगण्याचे कारण आहे प्रेम तुझे
असेच ते जपुन ठेव..
माझे आयुष्य तर कधीच संपले होते
माझा प्राण बनुन तु आलीस..
मरेल ग तु दुर गेलीस तर
मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस

आज तुझ्यासाठी लिहिताना
शब्द अपुरे पडत आहेत,
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी
शब्दच शब्द शोधात आहेत.

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना...
कळलेच नाही, कधी रडु लागलो...

आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर.....
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर......

Love Poem for whatsapp


आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते

आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले..........
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले....

आठवणीतील प्रेम कविता

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
 अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून

आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

आठवणी येतात....!
आठवणी बोलतात.....!
आठवणी हसवतात......!
आठवणी रडवतात.......!
काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात......!
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.

आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.

आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत,
 तुला ईतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,
 खोटे हासु आणायचे तरी कसे?

आठवणीच्या हिंदोळ्यावर
तुझे माझे भेटणे
एकांती पावूल वाटेवर
तुझ्या आठवणीतच माझे चालणे

आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !

Love Poem for Girlfriend

आधीच नाक तुझं एवढे एवढे,
त्यावर रागाचे ऒझे केवढे.
नजर तर अशी करारी,
कि काळजाला नुसते जखमांचे धडे

आन्तरीचा भावन्नाना
शब्दाची गरज नसते.
निशब्द नजरेला ओळखण्याचे
सामर्थ्य मात्र लागते.......
 
आपण घालवलेला एकही क्षण
विसरायला सांगू नकोस ......
तुला विसरनारे असतिलही
त्यात मला मोजू नकोस !!!"

आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.

आपल्याला प्रेम करता येते
कोणताच तेढ न ठेवता
मग आपण ते व्यक्त का करत नाही
कोणतेच आढेवेढे न घेता ?

आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं

आयुष्य हे एकदाच असते 
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.

आयुष्यभर ह्रदयाची, 
बनून राह राणी... 
तू ह्रदयात असता ,
हवं काय आणि...

आयुष्यात झालेली जखम,
कधितरी भुलवावी लागेल......
तुलाही आता, आयुष्याची
नवीन सुरुआत करावी लागेल

आयुष्यात प्रेम तसं ,
कमीच मिळालं...
म्हणूनच प्रेम फार ,
जवळून कळालं...

मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा Marathi Prem Kavita || love poems Marathi || मराठी प्रेम कविता लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies