देव दगडात असतो कि नसतो? || Swami Vivekananda Motivational Story

 

🌹देव दगडात असतो कि नसतो?

देव दगडात असतो कि नसतो?
☝एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान(अतिहुशार) व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले.

👉जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हणटले की,

 " स्वामीजी बघाना काय मूर्ख लोक असतात, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात.

किती मूर्खपणा आहे. 

मला तर देव या जगात अस्तित्वात असल्याचे वाटत नाही. सगळे थोतांड आहे.

तेहतीस कोटी काय या जगात एकही देव अस्तित्वात नाही."

सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का?❔

आणि.....

तो व्यक्ती खदखदा हसू लागला. 👉हे सर्व स्वामी विवेकानंदांनी 

 शांतपणे ऐकून घेतले व त्या व्यक्तीला म्हणाले की,

 " तुमच्या पाठीमागे भितींवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? "

त्या व्यक्तिने होकारार्थी मान डोलावून म्हटले "हो ते माझे वडील होते, दोन वर्षापूर्वी त्यांचा स्वर्गवास झाला आहे."

✨ स्वामीजी म्हणाले तुम्हांला कसे माहीत की तुमचे वडील स्वर्गातच गेले.

तो व्यक्ती निरूत्तर झाला. 

त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणुन ठेवण्यास सांगितलं. 

त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणुन ठेवला.

स्वामी विवेकानंदानी त्याला सांगितले कि, 

🌟आता एक काम करा, या फोटोवर थुंका.

तो व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहून म्हणाला. "काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांवर कसा काय थुंकू शकतो."

स्वामी विवेकानंद म्हणाले, " तो तर कागद आहे. ते थोडेच तुमचे वडील आहेत." 

त्यावर तो व्यक्ति म्हणाला "मी या फोटोमध्येच माझ्या वडिलांना पाहतो. त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही."

✨🌟 

यावर स्वामी विवेकानंद म्हणाले कि

👉 "जसे तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता तसेच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वर पाहत असतो. त्यामध्ये त्यांचा भक्तीभाव व श्रद्धा लपलेली असते."

हे ऐकून तो व्यक्ती खुप खजील झाला व विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागु लागला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या