Vote for a website आठवण स्टेटस || Mis You Status In Marathi
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

आठवण स्टेटस || Mis You Status In Marathi

0

 50+ आठवण स्टेटस || Mis You Status In Marathi     
‎प्रेमाच्या‬ या प्रेमळ हृदयात‬ आज 
अचानक ‪धडधड‬ झाली. डोळे‬ भरले 
‪‎पाण्यांनी‬ आणि ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली...


‎डोळ्यातून वाहणारा‬ प्रत्येक ‪अश्रू‬
निघतो ‪तुझ्या‬ शोधात आणि नकळत
‪‎हरवतो‬ तुझ्या ‪आठवणीच्या गावात‬..


हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात 
तुझीच आठवण ताजी आहे...
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे...


हृदयाचे जग रिकामे आहे ... 
जेव्हा पासून तू गेली आहेस...


हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे...
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे…


स्वतःलाच स्वतः विसरत असतो.....काय जादू मंतरलीस माझ्यावर,जिथे तिथे फक्त तुलाच शोधत राहतो..

स्तब्ध उभं राहून बघ ही वाट तुला पळताना दिसेल
आणि कुणाच्या आठवणीने हळुच मागे वळताना दिसेल


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
अंधार दाटला होता....
भूतकाळातील आठवणींना आज
पाझर फुटला होता....


सांजसकाळी कातरकाळी 
येतात नेहमी तुझ्याच आठवणी
आठवणी त्या मन करतात उदास
 तेव्हा खरंच हवा असतो हलवा स्पर्श तुझाच

सा-यांसाठी झिजताना मी फ़क्त तुझीच उरणार आहे झिजून जरी गेले तरी मी तुझ्या आठवणीत विरघळणार आहे.

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला की फुले सुकून जातात
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात

शांत संध्याकाळी समुद्रकिनारी 
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी 
एकटाच बोलत बसलो होतो...


शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…


वेळ लागला तरी चालेल...
पण वाट तुझीच पाहीन...
विसरलास तू मला तरीही...
नेहमी मी तुझीच राहील...


वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणाऱ्या सांजेचे..
आसुरलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अन 
आठवण तरंगते डोळ्याशी..


वेड मन माझं
त्याला समजावू किती..
तू येऊन गेलास तरीही
वाट पाहत राही तुझीच....


विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर 
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..


विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.


वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं...
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं....


वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…

Marathi Athvan Satus


वर्षाच्या प्रत्येक महिन्याला..
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला
दिवसाच्या प्रत्येक तासाला
तासांच्या प्रत्येक मिनिटाला
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला
आठवण येते तुझी मला
प्रत्येक क्षणा- क्षणाला.


लाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर फेसबुकवर भेट...


रोज तुझी आठवण येते आणि
डोळ्यांत पाणी उभं राहतं...
तू जवळ हवास असं वाटताना
खूप दूर आहेस हे सांगून जातं...


रातराणीच्या फुलांनी
हि सांज बहरू दे..
तुझ्या आठवणींच्या सुगंधाने
माझे मन दरवळू दे...येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणी शिवाय
येत नाही
दिवस जरी गेला तरी तुझी आठवण
जात नाही..

येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे..
तू येशील अशी उगीचच आस आहे..


येईन किंवा न येईन 
परत तुझ्या भेटीला, 
आठवणी माञ बांधून 
ठेवीन काळजातल्या गाठीला...


म्हटलं तर तसं सगळं छान आहे,
कुठे ही कमी नाही..
तरीही तू जवळ असल्याशिवाय 
कुठे ही मजा नाही...


मी असाच आहे..
मी असाच आहे..
कसाही असलो तरी
फक्त तुझाच आहे..
भेटलो नाही कधी तरी..?
भेट तुझी नि माझी नेहमीच आहे..
रागवणं हा तर फक्त बहाणा आहे..
प्रेम वाढविण्याचा हा
नविन FORMULA आहे..
तुझी आठवण येते, हे तर
कारण आहे..?
वेडे, तुला विनाकारण
छळणं हा तर,
माझा स्वभाव आहे..


माझ्यापासून दूर गेल्यावर..
आठवण माझी काढशील ना ?
काही बोलावसं वाटल तर..
मोबाईलवर एक कॉल करशील ना ?माझ्या ‪‎प्रितीची‬ चाहूल 
तुला कधीच कळणार‬ नाही....
आज मी तुझी 
वाट पाहत आहे 
उद्या मीच ‪‎मिळणार‬ नाही.....


माझ्या सावलीला ही सवय तुझ्या आठवणींची
आठवणीतच तुझ्या पांघरून घेण्याची
एकटेपण स्वतःच वाटून घेण्याची
सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची


माझ्या एकाकी जीवनात केवळ,
तू एक आठवण बनून राहलीस...
अन माझ्या प्रत्येक सुख दु:खात,
तू डोळ्यातील अश्रू होऊन वाहलीस...


माझी आठवण येताच 
मी जवळ असल्याच तुला भासेल..
तुझ्या डोळ्यातून निघालेला 
अश्रुचा प्रत्येक थेंब मी असेल.....


माझा आधार व्हायला 
शब्द कधीही तयार असतात 
अगदी तसचं माझा आजार व्हायला 
तुझ्या आठवणीही तयार असतात...


मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे....

मला कळतय ग तुझं
उदास आणि बैचेन मन..
मी पण तुझ्याच आठवणीत
हरवुन जातो प्रत्येक क्षण..


मनात आठवणी तर खूप असतात...
कालांतराने त्या सरून जातात...
तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात...
जे हृदयात घर करून राहतात

आठवणी प्रेमाच्या 


मनाच्या शिंपल्यात जपावा 
आठवणींचा मोती 
अशीच फुलत रहावी 
साताजन्माची नाती..


मनाचे भाव असतात
साधे भोळे,
तुझी आठवण येताच
भरतात डोळे....


मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं..
पण तरी ते तुलाच शोधत होतं..
तुला खरचं ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं...


बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बैचेन मन होते
आठवणीच त्याच्या मग
विश्व बनते
यालाच म्हणतात प्रेम कदाचित,
ज्याच्याविना आयुष्य थांबते...♥ ♥♥


प्रेम एक आठवण आहे 
हळूवारपणे जीवलग
माणसाशी ह्रदयात केलेली
साठवण आहे


प्रत्येक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात
प्रत्येक फुलाच्या सुगंधात एक जादू असते
जीवन कितीही चांगले असो वा नसो
पण सकाळी सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात


प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो सुखाला...
                 

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत...


पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली
चाळताना जीवाची झाली होती काहिली
पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली
तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त तुझीच कमी राहिली


निळ्या आकाशात गर्द काळे ढग,
पुन्हा गर्दी करून दाटतील...
आठवणी तुझ्या मनात माझ्या,
नव्याने संसार थाटतील....


नातं जपलं की सगळं जमतं,
हळूहळू का होईना कोणी
आपलसं बनतं,
ओळख नसली जन्माची
तरी साथ देऊन जातं,
आठवणीचं गाठोड अन्
डोळ्यात प्रेमाचा ओलावा
देऊन आपलसं करुन जातं..


नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात...


नकळत तुझी आठवण 
मनाला स्पर्शून जाते...
मी तुझी आता कुणीच नाही
पण तुला आपलेसे करून जाते...
.
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना, 
की मला काय करायचे ते कळतच नाही..
एक म्हणजे तू आणि
दुसरी म्हणजे तुझी आठवण...


दिवस नकळत जाई,
रात्र रेंगाळत राही..
असा एकही क्षण नाही,
की तुझी आठवण येत नाही...


तू बरसायला लागलास की,
आठवणींच्या सरी कोसळतात...
तुला सांगतो मग त्याही तुझ्यासारख्याच,
मनमोहक वाटू लागतात....


तू पोळी मी तवा
तू खीर मी रवा
तू पेढा मी खवा
तू वात मी दिवा
तू श्वास मी हवा
तू भाजी मी ओवा
आठवण काढत जा की कवा कवा  


तू आलीस जीवनी,
रंग माझे बहरून आले...
धूंद तुझ्या आठवणी,
नयनी अश्रू सोडूनी गेले...⁠⁠⁠⁠


तुला आठवताना एक भान
मला राखावं लागतं
असं देहाचं उजळणं
काळोखात झाकावं लागतं...


तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणं,
मला काही जमत नाही ................
तुझ्या आठवणीशिवाय ,
मन मात्र कशात रमत नाही ..


तुझ्यापासून सगळेच कसे अजाणते..
दुख, अश्रू अन विरह
तुझे विश्व तुझ्याशीच राहते..
अन आसवांच देणे फक्त माझ्या नशिबी येते...

 Mis You Quests


तुझ्यात आणि माझ्यात 
कुठे दुरावा आहे 
आठवण तिकडे आणि 
उचकी इकडे 
हाच आपल्या प्रेमाचा 
मोठा पुरावा आहे...

तुझ्याच आठवणीत तुला 
विसरण्याचा प्रयत्न करते,
आणि या विसरण्याच्या धुंदित 
पुन्हा पुन्हा आठवत राहते...


तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी 
फक्त त्यातील काहीक्षण दे ... 
आलीस तरी तुझ्या आठवणींना
तरी यायला वाव दे...


तुझ्या सुंदर आठवणीत 
अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा
अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी
आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या
आठवणीत रमायला


तुझ्या प्रत्येक आठवणीने होते माझी रोजची पहाट आणि ओलावतात भावनांनी डोळ्यांचे काठ.


तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श...
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष...


तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही...
तुझ्या चेहऱ्याशिवाय काहीच बघावस वाटत नाही...
तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही...
आणि तू समोर नसलीस की जगावसचं वाटत नाही


तुझी वाट पाहतांना,
अशीच बसलेली असते 
नेहमी मी उंबऱ्याशी...
गोंजारात अन कुरवाळत,
तुझ्या आठवांना माझ्या शब्दांशी....


तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‪‎ह्रदयाशी‬ खास आहे.
‪‎तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬ म्हणूनच चालू हा ‪‎श्वास‬ आहे...

तुझी एखादी कविता दे ना
माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला
सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला

तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
कधीच साथ न सोडणारी,
सदैव सोबत दरवळत रहणारी
पण तशीच हवी हवीशी वटणारी...


तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.

 
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही
डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र
तुच दिसतेस सर्व जागी
अशी फिलींग विचीत्र
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही
तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही
खूप गोड हसतेस तू 
खूप गोड लाजतेस तू 
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते
बोलायला असतं खूप काही पण ओठ हालत नाही
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही

तुझा नकळत झालेला स्पर्श 
आपल्या पहिल्या भेटीची आठवण..
स्पर्श जाणवतात आजही
मनातल्या मनात भावनांची गोठवण...


तिच्या आठवणींपासून दूर जाणं
तुला कधी जमणार नाही रे
तिने दिलेलं फूल सुकले तरी
सुगंध त्याचा सुकनार नाही रे..

Tuzya Athvani


तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.

तळमळतेय मी इथे तुझ्याविना
शून्य जाहले अवघे जीवन...


ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.....


डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे.....
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.


डोळ्यात साठलेल्या तुझ्या आठवणी
रात्र ही सरता सरेना,
किती दिवस लोटले तुला पाहून
स्वप्नात तरी ये ना..


ठाऊक आहे मला,
मी नसताना तू रडशील 
एकदा का होईना,
आठवण माझी काढशील ...


झाडावरच्या फुलांना गळताना पाहुण कधी रडु नये, 
कुणाच्या आठवणीत इतके खोलवर कधी पडु नये.
शब्द जड होतात अश्रु मात्र हलके आहेत,
म्हणुनच ओठांपेक्षा डोळेच जास्त बोलके आहेत. 
बोलुन भावना व्यक्त होतात ही खोटी आशा आहे,
'मौन' हीच खरी भाषा आहे..


जेव्हा गरज तुला असायची,
आपले काम सोडून मी बोलायचं,
आज मला गरज तुझी आहे,
मात्र मी नुसतच वाट बघायचं....

जीवन मिळते एकाचं वेळी......
मरणं येतं एकाचं वेळी...
प्रेम होतं एकाचं वेळी...
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...
सर्व काही होतं एकाचं वेळी...
तर तिची आठवण...
का..?. येते वेळो वेळी..

तुझी आठवणजीवन आहे तिथे आठवण आहेच
आठवण आहे तिथे भावना आहेच
भावना आहे तिथे मैत्री आहेच
आणि जिथे मैत्री आहे तिथे
फक्त तूच आहेच...


जीव तुटका होतो बोलण्यास,
तुला एक वेळ पाहण्यास,
तुझ्या जवळ येण्यास,
आशा राहते ती मनास,
असेच संपते दिवस 
नाही संपत तो प्रवास...


जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात....
तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...

जवळ तिच्या असताना,
शब्दाना फुटली ना भाषा...
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा...

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..


चारचौघात एकट बसण्यापेक्षा 
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर 
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं...

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस.....

खूप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र 
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात...

खूप कमी बोलतेस..
पण तेवढ्याच बोलण्यात
मन चोरतेस..
हळूच येऊन मनाच्या तारा
हळूवार छेड़तेस..
अन अशा अबोल भेटीतच
खूप आठवणी मनास देऊन
जातेस


खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र 
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात...


खरंच तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यांइतकी
तर साखरही गोड नाही...

खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
माझ्यासारख्याच भावना
म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
मी आल्यावर सुद्धा ते जाईना..


क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणीला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रूंच्या धारांमधून वाहते..


क्षण असा एकही जात नाही
की तू माझ्यासवे नाही..
नेहमीच असते मी तुझ्या सहवासात
सारखाच ध्‍यास असतो तुझ्याचं मन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies