Vote for a website Marathi Inspirational Quotes life Challenges|| मराठी प्रेरणादायी विचार
Type Here to Get Search Results !

Hollywood Movies

Marathi Inspirational Quotes life Challenges|| मराठी प्रेरणादायी विचार

0

 मराठी प्रेरणादायी विचार

Marathi Motivational Status|| मराठी प्रेरणादायी विचार
Motivational Thoughts In Marathi

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा. 

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो, अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडविले पाहिजे.

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे

सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.

Motivational quotes in marathi for success

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो, कृतीमुळेच सवय लागते, सवयीमुळे स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते. म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !


यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात कधी कधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि तुम्ही त्या दगडाना मैलाच्या दगडामध्ये रुपांतर करता.

यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !

Marathi inspirational quotes

प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो.
प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन संकटात मुळीच डगमगत नाही.

प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते.

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.


लक्ष्य दया:-  मित्रांनो तुम्हाला जर आमचा Marathi Motivational Status|| मराठी प्रेरणादायी विचार हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies