लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes In Marathi |
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes In Marathi
 |
anniversary marathi wishes |
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आभार! आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद! मी जर आयुष्यात काही कमावले असेल, ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं!
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे, समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे, संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली, एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली, अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही, लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र, पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही… हॅप्पी एनिवर्सरी मित्रा!
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
wedding anniversary wishes for wife in marathi
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे, यश तुम्हाला भर भरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… Wishing You Happy Wedding Anniversary!
प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
wedding anniversary wishes in marathi images
तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!! प्रिये तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो. तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो. आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
 |
anniversary msg in marathi |
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली, माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमी प्रेरणा देणारी अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास. Happy wedding Anniversary Dear
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे हीच आमुची शुभेच्छा
कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता असेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे, सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
anniversary msg in marathi
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली… लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Wedding anniversary…
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी, आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी, माझे सुंदर आयुष्य आहेस तू, माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू….. लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…